आमदारांवर कुठल्याही राजकीय पक्षाचं नाही, तर जनतेचं नियंत्रण असायला हवं. आमदारांवर पक्षाचं वर्चस्व ठेवण्यासाठी पक्षांतर बंदी कायदा आहे, मग जनतेचं वर्चस्व असण्यासाठी ‘राईट टू रिकॉल’ का नको?

गेल्या आठवड्यापासून महाराष्ट्रात सुरू असलेल्या ‘राजकीय थरारनाट्या’त सर्व काही आहे. दाक्षिणात्य सिनेमाला लाजवेल असा मसाला आहे, हिंदी सिनेमातही नसतील, एवढी लोकेशन दिसत आहेत. एखादा हॉलिवुड सिनेमाही फिका पडेल, एवढा खर्च हॉटेल, खाजगी विमान यांवर केला जातो आहे. या संपूर्ण राजकीय थरारनाट्यात जर काही नसेल, तर ती फक्त जनताच आहे. टाळ्या व शिट्ट्या वाजवणं, एवढंच एक दुर्दैवी काम जनतेकडे आलेलं आहे.......

अमेरिकेने अफगाणिस्तानात विकास केला असता अन् अफूला मुळातून संपवले असते, तर अफगाणिस्तानच्या अन् जगाच्या वाट्याला हे भयानक दिवस आले नसते

हे दुर्दैव फक्त अफगाणिस्तानच्या वाटेला आलेलं नाही. व्हिएतनाम, इराण, ग्वाटेमाला, लॅटिन अमेरिकेतील देश, आफ्रिकेतील देश यांची कमी-अधिक प्रमाणात हीच अवस्था अमेरिकेच्या धोरणामुळे झालेली आहे. अमेरिकेला फक्त आपल्या बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या हिताचे देणेघेणे आहे. त्यासाठी ती काहीही करायला तयार असते. दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिकेने ७०पेक्षा अधिक देशांवर प्रत्यक्ष अप्रत्यक्षरीत्या आक्रमण केलेले आहे.......

सर्वांना स्वातंत्र्य उपभोगायचं आहे, मजा करायची आहे. स्वातंत्र्याचा अर्थ सर्वांनाच कळलेला आहे. त्या स्वातंत्र्याच्या ‘हायवे’वर सगळे सुसाट वेगानं धावत आहेत, पण…

कशाला म्हणायचं ‘स्वातंत्र्य’? बाजारात पैसे देऊन ‘स्वातंत्र्य’ विकत घेता येतं का? संसदेत, सर्वोच्च न्यायालयात मिळेल का ‘स्वातंत्र्य’? स्वातंत्र्य हे कोणत्या पोपटाचं नावं आहे? आपल्याला स्वातंत्र्याची गरज तरी आहे का? की भागेल आपलं स्वातंत्र्यावाचून? अजूनही काही लोकांना वाटतं की, इंग्रज बरे होते. आपल्या देशासाठी बऱ्याच लोकांना हुकूमशाही चांगली वाटते. कुठे मिळेल ‘स्वातंत्र्य,’ कुठे शोधायचं त्याला?.......

मराठ्यांना आरक्षण मिळेल की नाही, यापेक्षा महत्त्वाचा प्रश्न हा आहे की, मराठा समाजात जी प्रचंड गरिबी निर्माण झालेली आहे, ती कशी दूर करता येईल?

आरक्षण हा काही गरिबी निर्मूलनाचा कार्यक्रम नाही. त्यामुळे मराठ्यांचे सर्व प्रश्न सुटतील असेही नाही. एका बाजूला सरकारी व खाजगी दोन्ही प्रकारच्या नोकऱ्या कमी होत आहेत, तर दुसऱ्या बाजूला आरक्षणाची मागणी जोर धरू लागली आहे. जी गोष्ट आपण मागत आहोत, तिचे फक्त पॅकिंग आकर्षक आहे, त्याच्या आतमध्ये काहीच नाही, ते रिकामे आहे. आशा खाली झालेल्या वस्तूचे आकर्षक पॅकिंग कुणाला मिळणार, यासाठी ही लढाई चाललेली आहे.......

अर्थसंकल्प २०२१ : जनतेच्या पैशावर उभ्या राहिलेल्या सार्वजनिक कंपन्या विकून ‘आत्मनिर्भरते’कडे वाटचाल करणारा ‘आत्मनिर्भर भारत’!

सरकार आवाहन करत आहे की, बहुराष्ट्रीय कंपन्यांनो, आम्ही आमच्या सरकारी कंपन्या कवडीमोल भावाने विकायला काढल्या आहेत, त्यांचा लिलाव चालू केला आहे, तुमच्यासाठी कामगार कायदे बदलले आहेत, कंपनी कर कमी केलेला आहे. तर तुम्ही या आणि आमच्या बाजारावर कब्जा करा. आणि यालाच ‘मेक इन इंडिया’ म्हटलं जात आहे. जेव्हा देश विकायला काढला आहे, तेव्हाच सरकारला ‘आत्मनिर्भरते’ची आठवण झाली आहे. प्रत्यक्षात ही घोषणा भोपळ्यासारखी आहे.......